ढाका : बांगलादेश ात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार सुरूच असून, नेत्रकोना जिल्ह्यातील आटपारा उपजिल्ह्यात सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या (बीएनपी) एका नेत्याने गर्भवती हिंदू शिक्षिकेवर हल्ला केला आणि पोटावर लाथ मारल्याची घटना मंगळवारी घडली.
स्थानिक माध्यमांनी या घटनेचे वृत्त दिले. ‘शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या स्थापनेवरून झालेल्या वादातून उपजिल्ह्यातील तेलिगाटी युनियनमधील कचरपर सरकारी प्राथमिक शाळेत सोमवारी ही घटना घडली. तेलिगाटी युनियन बीएनपी अध्यक्ष अन्वर हुसेन आणि शाळेचेे माजी शिक्षक नुरुझ्झमान खान पुतुल यांच्यासह अनेकांनी माझ्यावर हल्ला केला,’ असा आरोप पीडित हंगामी मुख्याध्यापिका निबेदिता देब यांनी केला.