जामीन निर्णयामुळे बिल्कीस यांना धक्का

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
bilkis bano shocked by bail decision
‘मोठ्या कष्टाने मिळवलेला न्यायच गमावल्याची जाणीव मला आज होत आहे. पुन्हा एकदा न्यायावरील विश्वास गमावण्याची भीती वाटते,’ अशा शब्दांत गुजरात दंगल पीडित बिल्किस बानो हिने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीदरम्यान सामूहिक बलात्कार आणि आपल्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या बिपिनचंद्र जोशी आणि प्रदीप मोरढिया यांना जामीन मंजूर झाला आहे. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ते १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याचे नमूद करून हा जामीन मंजूर केला. बिल्किस बानो हिने हा आदेश धक्कादायक आणि अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे.