नवी दिल्ली : ‘जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने (जीजेईपीसी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली वाढ आणि मूल्यवर्धित श्रेणींमध्ये परदेशातील वाढलेल्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२६मध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या एकूण ढोबळ निर्यातीत ३४.०१ टक्क्यांनी वाढ होऊन ती २७,८६२.८२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
ही तीव्र मासिक वाढ मागील वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या १९,२५३.६० कोटी रुपयांच्या तुलनेत अधिक आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये ढोबळ आयातही ८५.८५ टक्क्यांनी वाढून २३,२२५.२३ कोटी रुपयांवर पोहोचली. मासिक व्यापार कामगिरीवर भाष्य करताना, कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह म्हणाले, की ही वाढ देशांतर्गत उद्योगासाठी सकारात्मक गती दर्शवत आहे.