‘आनंदीबेन यांच्याविरुद्धते आंदोलन नव्हते’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
there was no movement against anandiben hardik patel
गांधीनगर : पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यावा लागल्याचा एका पाटीदार नेत्याचा दावा भाजपचे आमदार हार्दिक पटेल यांनी फेटाळून लावला आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीला पदावरून हटवण्यासाठी नसून, समाजाच्या कल्याणासाठी होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०१५ मध्ये हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाला ओबीसी दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

कोनेमारा ग्रंथालयातून बनावट पुस्तके जप्त
चेन्नई : राज्यातील ग्रंथालयांमध्ये बनावट पुस्तकांचा घोटाळा उघड झाला असल्याचे तमिळनाडूचे शालेय शिक्षणमंत्री राजमोहन यांनी मंगळवारी सांगितले; तसेच या घोटाळ्याचे वर्णन त्यांनी ‘जगातील पहिला एआय पुस्तक घोटाळा,’ असे केले आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी चेन्नईतील कोनेमारा ग्रंथालयातून ५२३ बनावट पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.

‘एमडी’ पुरवणाऱ्यांना इंदूरमध्ये अटक

इंदूर : मध्य प्रदेशात एमडी अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य अमली पदार्थ टोळीशी संशयित असल्याच्या आरोपावरून इंदूर गुन्हे शाखेने राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील दोन तस्करांना अटक केली आहे. उमर अली आणि शोएब उर्फ भुरा अशी आरोपींची नावे असून, स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्याच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

सरकारी आरोग्य केंद्रात रुग्णाच्या खाटेवर कुत्रा

अलीराजपूर : सार्वजनिक आरोग्य केंद्रात रुग्णाच्या खाटेवर भटके कुत्रे झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर आझादनगर आरोग्य केंद्रामध्ये ही घटना घडली असून, याबाबत चौकशी आहे.

न्यायाधीशांच्या टीकेला व्यंकटेशन यांचे प्रत्युत्तर

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. आर. स्वामीनाथन आणि सीपीआय (एम) चे मदुराई येथील खासदार व्यंकटेशन यांच्यात जीवनशैली आणि न्यायिक कर्तव्यांच्या टिप्पणीवरून शाब्दिक चकमक उडाली. सोमवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान न्या. स्वामीनाथन यांनी व्यंकटेशन यांच्या आलिशान जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्याला खासदार वेंकटेशन यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. आपल्याकडे कारही नसल्याचे सांगून त्यांनी हा प्रकार वैयक्तिक हल्ला असल्याचे म्हटले आहे.

तिहेरी हत्येतील संशयितांना अटक

दिब्रुगड : आसामच्या शिवसागर जिल्ह्यात मंगळवारी एका कुटुंबातील तीन सदस्यांच्या हत्येत सहभागाबद्दल दोघांना अटक करण्यात आली. दुलियाजानमधील कमलाबारी परिसरातील निवासस्थानी सोमवारी चंद्रकांत-एलिझा भुयान हेे दाम्पत्य मुलीसह मृतावस्थेत आढळले होते. कुटुंबाचा केअरटेकर राजू दास आणि साथीदार अमीर दास अशी आरोपींची नावे आहेत.