‘भाजप समर्थकांच्या मनात द्वेषाचे जाळे’

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘भाजप समर्थकांच्या मनात द्वेषाचे जाळे’
आई- वडिलांच्या नात्याविषयी केलेल्या विधानावरून टीकेला सामोरे जात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि रा. स्व. संघाच्या समर्थकांवर पलटवार केला. ‘भीती, राग आणि द्वेष यांनी त्यांच्या हृदयात असे जाळे विणले आहे की, ते प्रेमाचा अनुभव घेऊ शकत नाहीत किंवा ते व्यक्तही करू शकत नाहीत’, असे गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.

देवी पार्वती भगवान शिवाच्या मांडीवर बसलेल्याचे दर्शविणाऱ्या शिल्पाचे छायाचित्रही राहुल यांनी यावेळी शेअर केले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी राहुल यांनी बालपणीच्या आठवणी सांगताना आई बाबांच्या मांडीवर बसून जेवायची, असे सांगितले. त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल यांच्यावर टीका केली.