गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादातून एकाने वाहनचालकाला दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (१७ नोव्हेंबर) चिंबळी येथील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीत घडली.
स्वप्नील चंद्रकांत सोनकांबळे (वय २४, भोसरी, जि. लातूर) यांनी या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवींद्र तबाजी मांडवे (वय ३७, डोंगरकिन्ही, ता. पाटोदा, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी चिंबळी येथील माऊली कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीत माल भरण्यासाठी गाडी लावली होती.