तिन्ही मार्गांवर उद्या दुरुस्तीकामे

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तिन्ही मार्गांवर उद्या दुरुस्तीकामे
मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रेदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्तीची कामे ब्लॉकमध्ये करण्यात येतात. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे
स्थानक - ठाणे ते कल्याण

मार्ग - अप आणि डाउन जलद

वेळ - सकाळी १०.४० ते दुपारी ३.१०

परिणाम - ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून उर्वरित लोकल फेऱ्या सुमारे २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक - सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे

मार्ग - अप आणि डाउन

वेळ - सकाळी १०.४० ते दुपारी ४.४०

परिणाम - सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते गोरेगाव / वांद्रे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान आणि नेरूळ / बेलापूर ते उरण दरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार उपलब्ध असणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

मार्ग - अप आणि डाउन धीमा

वेळ - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

परिणाम - ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.