- विक्रमादित्य न. पणशीकर महाराष्ट्र टाइम्स.कॉम• 23 Nov 2026, 12:09 pm
राशिभविष्य मेष : चंद्रकृपेने कार्यक्षेत्रातील बदलाचे स्वागत करा. ज्येष्ठांचा विश्वास संपादन करण्यास प्राधान्य द्या.
वृषभ : कार्यक्षेत्रातील मतभेद दूर करण्यात पुढाकार घ्यावा लागेल. नव्या योजनेच्या मोहजालात फसू नका.
मिथुन : व्यावसायिक उलाढालीतील संकटावर मात कराल. ज्येष्ठांचा सल्ला कार्यसाधक ठरेल. कर्क : नोकरदारांना नव्या ओळखीमुळे संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील. सिंह : कार्यालयीन जबाबदारीत वाढ होण्याची लक्षणे दिसतील. नेतृत्वगुण सिद्ध करण्यास उत्तम संधी मिळेल. कन्या : देण्याघेण्याच्या व्यवहारात दिशाभूल होईल. गृहकर्तव्यास न्याय देण्याचा ताण वाढेल. तुळ : मनातील गैरसमजाचे सावट दूर होईल. आर्थिक समस्यांवर योग्य मार्ग मिळेल. वृश्चिक : व्यवहारात भागीदारांची साथ लाभेल. धोरणात्मक बदलामुळे आर्थिक स्थितीत सुधार होईल. धनु : नोकरदारांनी मान्यवरांचा सल्ला घ्यावा. आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होईल. मकर : आर्थिक व्यवहारातील अस्थिरता वाढेल. कुंभ : नव्या संकल्पना राबवण्याचे श्रेय मिळेल. मित्रपरिवाराचे समाधान करणे शक्य होईल. मीन : नव्या योजनांना आर्थिक पाठिंबा मिळेल.