वसई : नालासोपारा येथील महावितरणच्या आचोळे उपकेंद्रातील सहायक अभियंता श्रीकृष्ण राजस यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. नवीन वीजजोडणी मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार खासगी इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांनी १५ ग्राहकांच्या नवीन वीज मीटरसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. या फाइल्स मंजूर करण्यासाठी राजस यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.