मोठा नेता पुन्हा काँग्रेसमध्ये?

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,कल्याण|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
राजस्थानमधील निवडणूक निकालानंतर पक्ष सोडून गेलेले अनेक जण पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्रातील एक मोठा नेता काँग्रेसमध्ये परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून महिनाभरात राजकीय घडामोडी घडतील, असा दावा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग बरगे यांनी केला.

श्रीरंग बरगे यांची कल्याण-डोंबिवली क्षेत्रासाठी पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी डोंबिवली येथे कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या संविधान रक्षा रॅलीच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.