उद्यानांच्या सुरक्षेबाबतची पत्रे बेदखल

Contributed by: सुशांत मोरेsushant.more@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उद्यानांच्या सुरक्षेबाबतची पत्रे बेदखल
मुंबई : उद्याने, मैदान आणि मनोरंजन उद्यानांमध्ये पोलिस बंदोबस्त आणि नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिका बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी एप्रिल २०२६ मध्ये मुंबई पोलिसांना पाठवले होते. तर, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यासह सीसीटीव्ही बसविणे, उद्यान, मैदानांच्या देखभालीसंदर्भात महापालिका आयुक्तांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, या पत्रांची दखलच घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुर्ला येथे अल्पवयीन मुलांच्या दादागिरीच्या प्रकरणावरून उद्यानांतील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील अनेक उद्याने आणि मैदानांमध्ये समाजकंटकांचा वावर वाढत असून, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, या पत्रांची साधी दखलही घेतली नसल्याची खंत हेतल गाला यांनी व्यक्त केली. कुर्ला पश्चिमेकडील प्रमोद महाजन उद्यानातील घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत पुन्हा (पान ५वर)