भारतात दाखलनवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांचे रविवारी भारतात आगमन झाले. ऊर्जा, जलविद्युत, रेल्वे, दळणवळण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेंद्र शाह यांच्यात सोमवारी होणाऱ्या चर्चेत प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. वृत्त...१०
रणगाड्याखाली चिरडून
दोन जवानांचा मृत्यू
हिसार : नियमित लष्करी सरावावेळी उडालेल्या धुळीच्या लोटामुळे दृश्यमानता कमी झाल्याने एका रणगाड्याने दोन जवानांना चिरडल्याची दुर्दैवी घटना हिसार जिल्ह्यातील भोजराज गावाजवळ शनिवारी घडली. सरावादरम्यान सुमारे ३२ रणगाडे धावत होते, तर काही जवान जमिनीवर मोक्याच्या ठिकाणी तैनात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
कंत्राटदाराला
एक लाखाचा दंड
मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण आणि तरुणीला टवाळखोरांनी मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर उद्यानाची देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराने कर्तव्यात हलगर्जी केल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.वृत्त...३
तुर्कीयेत हवामान
परिषद फिस्कटली
अंताल्या (तुर्कीये) : जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या जीवाश्म इंधनांचा करारात उल्लेख करायचा की नाही, या मुद्द्यावर झालेल्या तीव्र मतभेदांमुळे तुर्कीयेमध्ये सुरू असलेली संयुक्त राष्ट्रांची गोंधळलेली हवामान परिषद कोणत्याही सर्वसमावेशक कराराशिवाय फिस्कटली.वृत्त...७