जलसंधारणावर सरकारचा भर

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जलसंधारणावर सरकारचा भर
राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३० जून २०२७पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

‘शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असून, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभागासह अन्य विभागांच्या समन्वयातून कामे करण्याचा निर्णय दुष्काळावरील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे’, अशी माहिती मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिली.
‘स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना झाल्यापासून राज्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार (पान ५वर)