‘लोकप्रतिनिधींचे बळ आवश्यक’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
‘लोकप्रतिनिधींचे बळ आवश्यक’

‘कोकणच्या हापूसच्या नाममुद्रेच्या संरक्षणासाठी हापूस उत्पादक आंबा बागायतदार संघाचा लढा सुरू आहे. त्यास कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनींचे बळ मिळणे आवश्यक आहे’, असे रत्नागिरीतील आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले. आता ‘हापूस’ (अल्फान्सो) या नावासाठी कोणीही अर्ज केल्यास त्यावर ‘जीआय’ रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे कोणतीही सुनावणी होणार नाही, अर्ज फेटाळला जाईल, असा तोडगा निघायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.