‘दूरदृष्टीने नुकसान टळले’

Contributed by: नवी दिल्ली,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘दूरदृष्टीने नुकसान टळले’
सोनेखरेदी कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचे स्पष्ट करीत व्यापाऱ्यांच्या संघटनांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पंतप्रधानांच्या सल्ल्यामुळे लाखो सराफ, व्यापारी आणि गुंतवणूकदारांचे मोठ्या नुकसानापासून संरक्षण झाले’, असे ‘चेंबर ऑफ ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री’ने (सीटीआय) म्हटले आहे. तर, सोन्याच्या आयातीत ४० टक्क्यांनी घट झाल्याचे श्रेय ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट) पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीला दिले आहे.

पश्चिम आशियातील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर परकीय चलनाची बचत आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १० मे २०२६ रोजी नागरिकांना सोनेखरेदी कमी करण्यासह सात आवाहने केली होती. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी लखनऊ येथे शनिवारी झालेल्या दीक्षान्त समारंभात सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर ‘सीटीआय’ने रविवारी पंतप्रधानांना पत्र पाठवले. ‘तुमच्या दूरदृष्टीमुळे लाखो सराफ आणि गुंतवणूकदार कर्जबाजारी होण्यापासून वाचले’, असे ‘सीटीआय’ने पत्रात म्हटले आहे. ‘पंतप्रधानांच्या आवाहनावेळी सोन्याचा दर प्रतिकिलो १.९० कोटी रुपये होता. आता तो दर प्रतिकिलो १.२५ कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच प्रतिकिलो ६५ लाख रुपयांची घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी तुमचा सल्ला दुर्लक्षित करून त्यावेळी सोने खरेदी केले असते, तर आज त्यांना प्रतिकिलो ६५ लाख रुपयांचे नुकसान (पान ५वर)