धुळ्याच्या नऊ भाविकांचा मृत्यू

Contributed by: धुळे,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
धुळ्याच्या नऊ भाविकांचा मृत्यू
राजस्थानातील खाटूश्याम येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळ्यातील एका कुटुंबीयांच्या वाहनाला कोटा-उदयपूर महामार्गावर शंभुपुरा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात राहणारे पवार कुटुंबीय मध्य प्रदेश व राजस्थान राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन वेगवेगळ्या क्रूझर वाहनांतून ३६ जणांसह गेल्या मंगळवारी देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर, सालासर बालाजी यानंतर खाटूश्यामजी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा ते परतीच्या प्रवासाला निघाले. क्रूझरमध्ये १६ प्रवासी बसले होते. ही गाडी कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभुपुरा गावाजवळ मध्यरात्री बाराच्या सुमारास पोहोचली असता, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातात वाहनाचा (पान ५वर)