‘हापूस’ची नाममुद्रा टिकवण्याचे आव्हान

Contributed by: रत्नागिरी,प्रसाद रानडे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

भौगोलिक मानांकन अबाधित राखण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींना साद

‘हापूस’ची नाममुद्रा टिकवण्याचे आव्हान
सुमारे आठ वर्षांपूर्वी भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झालेल्या कोकणातील हापूस आंब्याचा दबदबा देश-विदेशातील आंबा बाजारात कायम असला तरी ही नाममुद्रा टिकवण्याचे मोठे आव्हान उत्पादकांपुढे आहे. जुन्नरमधील शिवनेरी, गुजरातचा वलसाड आणि तामिळनाडूतूनही ‘हापूस’वर दावेदारी करण्यात येत असताना कोकणच्या हापूसचे ‘जीआय’ मानांकन टिकवण्यासाठी कोकणातील उत्पादकांनी लोकप्रतिनिधींना साद घातली आहे.

कोकणातील हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आणि मागणी आहे. या हापूसला भौगोलिक मानांकन मिळवण्याचे प्रयत्न २०१०पासून जोरकसपणे सुरू झाले होते. तत्कालीन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने कोकणातील हापूस आंब्याला (अल्फान्सो) २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त (पान ५वर)