‘प्रशिक्षण आणि पूर्वतयारी वेळेत पूर्ण करा’ प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकाची आणि राज्यातील तयारीची माहिती दिली. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ‘जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होऊन कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा’, असेही त्यांनी नमूद केले.