‘एफडीए’च्या कारवायांना मंत्र्यांकडून खो

Contributed by: शर्मिला कलगुटकर sharmila.kalgutkar@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘एफडीए’च्या कारवायांना मंत्र्यांकडून खो
मुंबई : सर्वसामान्यांच्या आरोग्यहितासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम सुरू केली असताना गुणवत्ता निकष आणि अन्न व औषध सुरक्षा कायद्याच्या अनुषंगाने केलेल्या कारवायांना खो घालण्याचा प्रयत्न एफडीए मंत्रिकार्यालयातून होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गुणवत्ता निकषांचे पालन न केल्याने परवाना रद्द केलेल्या पुणे आणि नागपूर येथील दोन औषध उत्पादकांवरील कारवाईला स्थगिती देत औषध उत्पादनांसाठी मंत्रिकार्यालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या अधिकृत माहितीनुसार त्रुटींची पूर्तता करण्यासाठी या दोन्ही औषध उत्पादकांना पुरेसा कालावधी दिला असतानाही त्या त्रुटी कायम ठेवून अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे अपील करून या उत्पादकांनी पळवाटा शोधल्या आहेत. अटीशर्तींची पूर्तता न केल्याबद्दल त्यांच्यावर(पान ५वर)