राहुल गांधी यांनी मंगळवारी आकाशवाणी भवन परिसरात पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर बुधवारी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ‘आपल्यावरील प्रत्येक गुन्हा पदकासारखा आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आपण आणखी आंदोलन करत राहू असे राहुल यांनी स्पष्ट केले.