जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमुळे आलेला परकी चलनाचा ओघ आणि डॉलरची मागणी आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेला हस्तक्षेप यामुळे बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ४८ पैशांनी वधारून ९४.४३वर बंद झाला.
आंतरबँक परकी चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ९४.७८ वर खुला झाला. दिवसभरात तो ९४.४१ व ९४.८२ यामध्ये हिंदोळत राहिला. दिवसअखेर तो ९४.४३वर स्थिरावला.सहा चलनांच्या तुलनेत डॉलर ची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.०७ टक्क्यांनी वधारून १०१.५९ वर व्यापार करत होता. जागतिक तेल मानक असलेला ब्रेण्ट क्रूडचा वायदा दर १.९९ टक्क्यांनी वधारून प्रतिबॅरल ११०.९६ डॉलरवर व्यापार करत होता.