नवी दिल्ली : लोहखनिज, वीज आणि सिमेंट क्षेत्रांच्या मजबूत कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये प्रमुख पायाभूत सुविधा उद्योगांचे उत्पादन ७.९ टक्क्यांनी वाढले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली. ऑगस्टमध्ये या प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचा विस्तार ५.९ टक्के झाला होता.