Congress Protests Second Day Of Demonstration Demanding Resignation Of Gyanesh Kumar
सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
Contributed by: नवी दिल्ली,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राजधानीत आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह आघाडीच्या नेत्यांनी जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मार्ग रोखल्यानंतर नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.