मुंबई : राज्यात गर्भलिंगनिदान आणि त्यानंतर होणाऱ्या गर्भपातांना प्रतिबंध करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाही अनेक जिल्ह्यांतील जन्मलिंग गुणोत्तरातील घट चिंतेची ठरत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातील उपलब्ध आकडेवारीनुसार, सन २०२४च्या तुलनेत सन २०२५मध्ये राज्याचे जन्मलिंग गुणोत्तर ९१२वरून ९१०वर आले आहे.
जन्मलिंग गुणोत्तर म्हणजे दर एक हजार मुलांमागे जन्मणाऱ्या मुलींची संख्या. या प्रमाणात घट होणे हे सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर संकेत मानले जातात. मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण घटल्याने ‘लेक लाडकी’चा संदेश प्रत्यक्षात कितपत रुजतो आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार अमरावती, यवतमाळ, मुंबई, जालना, वाशीम, धाराशीव, वर्धा, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये जन्मलिंग गुणोत्तरात घट नोंदली गेली आहे. सर्वाधिक घट धुळे जिल्ह्यात झाली असून, येथे हे प्रमाण ९३६वरून ८७५वर (पान ५वर)