‘राज्यात आधुनिक प्रशिक्षण केंद्रे’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
establishment of modern skill training centers in maharashtra
मुंबई : ‘महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मरिन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा येणार आहे’, अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली.

‘वाढवण बंदर, मरिन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तरुणांमधूनच उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णापटनम येथील प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्किल ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावाला अदानी स्किल सेंटरने प्रतिसाद दिला आहे’, असेही राणे यांनी सांगितले.