Iit Bombay Suspends One Semester Suspension Policy
एक सत्र निलंबनाची शिक्षा तूर्त स्थगित
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपावरून विद्यार्थ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याच्या दिशेने आयआयटी मुंबईने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. परीक्षेतील गैरप्रकार हाताळण्यासाठी जुलै २०२६मध्ये लागू करण्यात आलेले कडक नियम तूर्तास स्थगित ठेवून सन २०१५ची नियमावली आणि कार्यपद्धती पुन्हा लागू करण्याचा निर्णय आयआयटी मुंबईच्या अधिसभेने बुधवारी घेतला. त्यामुळे गैरप्रकाराच्या प्रत्येक प्रकरणात एका सत्रासाठी शैक्षणिक निलंबनाची शिक्षा देण्याची तरतूद सध्या लागू राहणार नाही.
सुमारे अडीच तास झालेल्या अधिसभेच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थ्याला शिस्तभंगाची कारवाई सुरू होण्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यावर अधिसभेने भर दिला. नव्या कार्यपद्धतीचे स्वरूप निश्चित होईपर्यंत २०१५च्या प्रक्रियेनुसारच प्रकरणे हाताळली जाणार आहेत.पुन्हा उत्तरपत्रिका, नंतर चौकशी
सन २०१५च्या कार्यपद्धतीनुसार, परीक्षेत गैरप्रकार केल्याचा संशय असलेल्या विद्यार्थ्याकडील संबंधित साहित्य ताब्यात घेतल्यानंतर त्याला नवीन उत्तरपत्रिकेवर परीक्षा सुरू ठेवण्याची संधी दिली जात होती. घटनेचा अहवाल तयार करून तो विभागप्रमुखांकडे पाठविला जात असे. त्यानंतर विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कृती समिती प्रकरणाची तपासणी करत असे. या नियमांनुसार प्रत्येक कॉपीच्या प्रकरणात निलंबनाची शिक्षा लागू नव्हती. सामूहिक कॉपी, वारंवार (पान ४वर)