चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दर ५.२ टक्के राहील, असा अंदाज गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेने ४ टक्के ते ६ टक्के या दरम्यान महागाई दर असला तर तो सुसह्य असेल, असे याआधी जाहीर केले होते. आता चालू आर्थिक वर्षअखेर महागई ५.२ टक्के होणार असल्याने आरबीआयच्या सुसह्य दराच्या कमाल मर्यादेजवळ तो जाणार आहे.