मराठा विद्यार्थ्यांना ‘ओबीसी’ सवलती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
maratha students to get obc education benefits
मंुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ मिळणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशांनंतर तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक प्रमोद नाईक यांनी याबाबतचे आदेश काढले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून या सवलती लागू होणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ३ सप्टेंबर रोजी पत्र जारी केले आहे.
‘मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व सवलती त्यांना मिळाव्यात, यासाठी मी संबंधित विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार आदेश निघाले’, असे उदय सामंत यांनी सांगितले.