Murder Of An Officer At A Petrol Pump In Hingoli District
पेट्रोल पंपावर अधिकाऱ्याची हत्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पेट्रोल पंपावर अधिकाऱ्याची हत्या
नवी दिल्ली : हिंगोली जिल्ह्यात एक पेट्रोल पंप सील करत असताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली. या हल्ल्यात त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेची तुलना सन २००५मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या एका अधिकाऱ्याच्या खुनाशी केली जात आहे.वृत्त...५कागान, सोआई यांना रसायनशास्त्राचे नोबेल
स्टॉकहोम : रासायनिक रेणूंमधील आरशासारख्या गूढ प्रतिमांची उकल करून विज्ञानविश्वाला नवी दिशा देणारे शास्त्रज्ञ हेन्री बी. कागान आणि केन्सो सोआई यांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. ‘द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ने स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा केली.
वृत्त...१०
मुंबईकरांसाठी
१७०० मिडी बस
मुंबई : एकात्मिक परिवहन प्रणालीअंतर्गत बसची सद्यस्थिती, अपघात रोखण्यासाठी बसचालकांच्या हालचाली टिपणारा कॅमेरा, प्रवाशांसाठी १७०० मिडी एसी बस, पर्यटनासाठी छतविरहित डबल डेकर बसगाड्या आणि विद्युत वितरण वाहिनीचे जाळे विस्तार करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने २०२७-२८च्या अर्थसंकल्पीय अंदाजातून जाहीर केला आहे.
वृत्त...२
कांद्याचा भाव
८० रुपयांवर
नवी मुंबई : पावसाने यंदा लवकर घेतलेली माघार, कांद्याचे घटलेले उत्पादन आणि कांदा-बटाटा बाजारातील ५० किलोच्या गोणीच्या वादाचा परिणाम आता कांद्याच्या भावावर होऊ लागला आहे. ‘एपीएमसी’च्या कांदा-बटाटा बाजारात आवक घटल्याने घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ४५ ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हाच कांदा ८० रुपये किलो भावाने विकला आहे.वृत्त...२
सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा न मिळाल्याने पक्षाचे कार्यकर्ते कमालीचे खचल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बुधवारी दिली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही जागा न मिळणे ही पक्षाचे सामूहिक अपयश असल्याचे जाहीर विधान केले होते. वृत्त...५
ऐन दुष्काळात पळवले नाशिकचे पाणी
निफाड : पावसाने फिरवलेली पाठ आणि दुष्काळाचे सावट यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नांदूर-मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. वृत्त...५