Pre evaluation Of Central Assistance Meeting Between Chief Minister Fadnavis And Home Minister Amit Shah
केंद्रीय मदतीचा पूर्वआढावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शहा यांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती विषद केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी तसेच राज्याला दिल्या जाणाऱ्या केंद्रीय मदतीचा पूर्वआढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज, गुरुवारपासून रविवारपर्यंत राज्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.