रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.२५ टक्के वाढवून ५.५ टक्के केल्यानंतर बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी घसरून ९६.७८वर बंद झाला. हा रुपया सार्वकालिक नीचांक ठरला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९६.३७ वर उघडला आणि ९६.३४ व ९६.८४ यामध्ये व्यवहार करत अखेरीस ९६.७८ वर स्थिरावला.