पुणे : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन (स्वायत्त), पुणेच्या मानसशास्त्र विभाग आणि सृजन सायकोलॉजिकल सेंटर, बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मन-संवाद : वास्तव आणि दिशा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता एसएनडीटी विद्यापीठाच्या जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सभागृहात कार्यक्रम होईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी दिली.
या कार्यक्रमात लेखक अच्युत गोडबोले यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सृजन सायकोलॉजिकल सेंटरच्या फाउंडर डायरेक्टर सायली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत, असे विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता भडगावकर यांनी सांगितले.