यंगस्टर्स संघाचा ‘पेस’वर विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
youngsters team defeats pace by 97 runs
पुणे : श्रेयांश ढमाळची नव्वद धावांची खेळी आणि अर्णव राखपसरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यंगस्टर्स अकादमीने १२ वर्षांखालील गटाच्या व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत पेस ॲथलेटिक अकादमीवर ९७ धावांनी विजय नोंदवला.

दुसऱ्या लढतीत युवान चौगुलेची नाबाद ८५ धावांची खेळी आणि जिनय मुथाच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अकादमीने लेसाल्ट अकादमीचा १०२ धावांनी सहज पराभव केला.
संक्षिप्त धावफलक : यंगस्टर्स अकादमी - ४० षटकांत ९ बाद २३६ ( श्रेयांश ढमाळ ९०, अर्णव राखपसरे ५२, ध्रुव शर्मा २३, अंश राज २-४६, संचितकुमार २-३२) वि. वि. पेस ॲथलेटिक अकादमी - सर्व बाद १३९ (संचितकुमार २३, अरिंजय जैन १९, श्लोक गौर ३-२१, संकेत घुगे २-२४, अर्णव राखपसरे २-२३); क्रिकेट नेक्स्ट अकादमी - सर्व बाद १८१ (युवान चौगुले नाबाद ८५, प्रचिती पाटील ३-३२, समर्थ पाटील २-२६, जोर्तिमय झापूगडे २-२१) वि. वि. लेसाल्ट अकादमी - २७.३ षटकांत सर्व बाद ७९ (प्रचिती ३०, शिवेंद्र धुमाळ २५, जिनय मुथा ५-११).