‘मत्स्य व्यावसायिकांनाही मदत मिळवून देणार’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘मत्स्य व्यावसायिकांनाही मदत मिळवून देणार’
वाशीम : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलाशय आणि तलावांतील पाणीसाठा कमी झाला असून, मत्स्य व्यवसायापुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा आहे. त्यामुळे प्रत्येक नुकसानीची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिक बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यात ते बोलत होते. बैठकीला आमदार भावना गवळी, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त भानुदास पालवे आदी उपस्थित होते.