मुंबई : अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईईच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना दोनदा संधी मिळावी, यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) डिसेंबर आणि एप्रिल महिन्यात घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मागे घेतला आहे. यापुढे सीईटीची संधी दोनदा मिळणार असली, तरी दोन्ही सीईटी बारावीच्या परीक्षेनंतरच होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सीईटी कक्षातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून उच्च व तंत्रशिक्षण (पान ८वर)