इन्फोसिस, विप्रो, टाटाचे‘ग्रीन कार्ड’ लाभ रद्द

Contributed by: वृत्तसंस्था,वॉशिंग्टन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
इन्फोसिस, विप्रो, टाटाचे‘ग्रीन कार्ड’ लाभ रद्द
कर्मचाऱ्यांची निवड करताना अमेरिकी नागरिकांना डावलून परदेशी नागरिकांना प्राधान्य देणे, त्यासाठी एच१-बी व्हिसाचा कथित गैरवापर करणे असे आरोप ठेवत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी कंपनी मायक्रोसॉफ्टला करत एच१-बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्याच्या कार्यक्रमातून निलंबित केले आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी गुरुवारी यासंदर्भातील घोषणा केली. तसेच अमेरिकी कामगार विभागाने ‘पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम’मधून (पर्म) कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल आणि केपजेमिनी अशा मोठ्या आयटी कंपन्यांना निलंबित केल्याची माहिती कामगारमंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी दिली आहे.
‘एच-वनबी’ व्हिसाधारक कामगारांना ‘ग्रीन कार्ड’साठी अर्ज करण्याची परवानगी कंपन्यांना देणाऱ्या (पान ८वर)