‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीवर ताशेरे

Contributed by: वॉशिंग्टन,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
microsoft suspended from perm program allegations by vice president j d vance
कुशल परदेशी कामगारांना कायमस्वरूपी निवासाचा दर्जा मिळवून देणाऱ्या ‘पर्म’ कार्यक्रमातून ‘ मायक्रोसॉफ्ट ’ आणि ‘अ ॅडोब’ला निलंबित करताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’वर कडक ताशेरे ओढले. ‘‘मायक्रोसॉफ्ट’ने एकाच वेळी हजारो अमेरिकी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना हजारो ‘एच-वनबी’ व्हिसा आणि ग्रीन कार्डचा लाभ घेतला,’ असा आरोप व्हान्स यांनी केला.

‘मायक्रोसॉफ्ट’ला ‘पर्म’ कार्यक्रमातून निलंबित करण्याची घोषणा करताना व्हान्स म्हणाले, की कंपनीने ६,००० अमेरिकी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आणि त्याच वेळी ६,३०० ‘एच-वनबी’ व्हिसा आणि जवळपास ३,००० ‘ ग्रीन कार्ड ’चा लाभ घेतला. ‘दुर्दैवाने, अमेरिकेतील कोणत्याही कंपनीने मायक्रोसॉफ्टपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेचा गैरवापर केलेला नाही,’ असेही व्हान्स म्हणाले.
अमेरिकेने ‘कॉग्निझंट’, ‘इन्फोसिस’, ‘टाटा’, ‘विप्रो’, ‘केपजेमिनी आणि ‘एचसीएल’ यांसारख्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना ‘पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन’ (पर्म) कार्यक्रमातून निलंबित केले आहे.