Nana Patekar A Flourishing Journey Of Five Decades In Acting
पाच दशकांची समृद्ध कारकीर्द
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाना यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. नाना यांनी पाच दशकांच्या अभिनय कारकीर्दीत ८० हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा सशक्त ठसा उमटवला. या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, तसेच प्रादेशिक सैन्यात त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवीही बहाल करण्यात आली. नाना पाटेकर यांच्या दर्जेदार अभिनयाची साक्ष देणारे तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना परिंदा (१९९०), क्रांतिवीर (१९९५) आणि अग्निसाक्षी (१९९७) या चित्रपटांसाठी मिळाले आहेत. याशिवाय फिल्मफेअरच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता आणि खलनायक अशा तीनही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणारे ते एकमेव अभिनेते आहेत. नानांचे पाच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.