उषाताई खुळे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उषाताई खुळे
निधन वार्ता

मूळ तिवसा (जि. अमरावती) रहिवासी उषाताई खुळे (वय ७३) यांचे बुधवारी रात्री उपचारादरम्यान नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तिवसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे अभिषेक खुळे यांच्या त्या आई होत.
संगीता धर्मपुरीकर

महाल रहिवासी संगीता कृष्णराव धर्मपुरीकर (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.

शालिनी गुळकरी

सुभाषनगर रहिवासी शालिनी गुळकरी (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुले रवी, जयंत, संजय, आणि मुलगी अर्चना यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे. वरिष्ठ पत्रकार रवी गुळकरी यांच्या त्या आई होत.