Dazzling Performances In Childrens Skating Competition
चिमुकल्यांची स्केटिंग स्पर्धा उत्साहात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : स्वावलंबीनगर येथील टिप टॉप कॉन्व्हेंटच्यावतीने गांधीनगर येथील शिवाजी स्केटिंग क्लबच्या स्केटिंग रिंकवर आंतरशालेय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन आशिष फडणवीस यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत आदिश फडणवीस, रेवंत मेश्राम, नित्या मेश्राम, गौरी टिकेकर, झायरा मुंजेवार, आयेशा मुंजेवार, माधव मुंडला, अथांग राजगुरू, तारिणी शुक्ला, भूमी लाखे, ईशान तिवारी, भाविका कोठेकर, उमंग नितनवरे, आर्य चौधरी, देवेश शरन्ना, देवेश फडणकर, कृष्णा कांबळे, गार्गी जाधव, ओरन गौतम, दिशा डोंगरे, मिहिका कनोजिया, अविराज खंगण, वेदाती सोनवणे आदींनी उल्लेखनीय कामगिरी केली.