वानाडोंगरीत ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वानाडोंगरीत ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात
नागपूर : वानाडोंगरी येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दत्ता मेघे मेडिकल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे उपसंचालक गिल, पूर्व विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष सुधीर भगत, सचिव दीपक शेंडेकर, आदर्श ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष अण्णा वियनवार, सचिव भडके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या शुभम दिलीप धोटे याचा सत्कार करण्यात आला. डॉ. शरद निंबाळकर यांनी उपस्थित ज्येष्ठांशी संवाद साधला. शुभम धोटे याचे कौतुक करत त्याला शासकीय नोकरीतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुधीर भगत यांनी सरकारी सवलती आणि ज्येष्ठांच्या हक्कांसाठीच्या कायद्यांवर मार्गदर्शन केले. गिल यांनी रुग्णालयात ज्येष्ठांसाठी अत्यंत अल्पदरात उपलब्ध असलेल्या सोयींची माहिती दिली. दीपक शेंडेकर यांनी ज्येष्ठांच्या संघटनात्मक वाढीवर भर दिला. महामंडळाचे समन्वयक अंजनकर यांनीही उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार प्रभाकर कापसे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक इंगळे यांनी केले. आभार सहसचिव वसंत सहारकर यांनी मानले.