Special Session For Senior Citizens Focusing On Lifestyle And Moral Values
जीवनशैली, नैतिक मूल्यांवर विशेष सत्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांना आयुष्याचा खरा आनंद लुटता यावा, यासाठी सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टद्वारे पश्चिम बालाजी नगरातील हनुमान मंदिरात विशेष प्रबोधनपर सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हेल्पेज इंडियाचे व्यवस्थापक हेमंत दानव, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकारी संख्या टिकले यांची उपस्थिती होती. डॉ. संजय खोडे यांनी योगाभ्यास आणि तांत्रिक माहिती दिली. वृद्धापकाळात मानवाला आवश्यक जीवनसत्त्वे सहज उपलब्ध करून देणाऱ्या वनस्पतींची माहिती देताना आपल्या पूर्वजांच्या १०० वर्षे जगण्याच्या उदाहरणांचा संदर्भ त्यांनी दिला. डॉ. कल्याण अय्यर यांनी ज्येष्ठांनी नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार करण्याचा मोलाचा सल्ला दिला. डॉ. रंजना ढोक यांनी आद्य गुरु शंकराचार्यांचे बालपण, विचार आणि तत्त्वज्ञान यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक कौन्सिलचे सचिव सुरेश रेवतकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमिला राऊत यांनी केले. आभार माधुरी भुजाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान टिचकुले, संजय अस्वले, राजेश धरमढोक, नामदेव आमले, सरोज मेश्राम, मीरा गिरीपुंजे, प्रल्हाद दलाल, वासुदेव वाकोडीकर यांचे सहकार्य लाभले.