डायरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
various social and cultural events in nagpur
कृषी विकास प्रतिष्ठान : बंडोपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान सोहळा, महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, सकाळी १०.१५ वाजता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कार्यक्रम, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, अमरावती मार्ग, दुपारी १ वाजता.
सर्वोदय आश्रम : लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘सत्याग्रहाचा वारसा आणि जेन-झी आंदोलन’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परिसंवाद, सर्वोदय आश्रम, अमरावती मार्ग, धरमपेठ, दुपारी ३.३० वाजता.

हडस नागपूर माजी विद्यार्थी संघटना : दशपूर्तीनिमित्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘सायबर क्राइम अण्ड ड्रग रिलेटेड क्राइम’ या विषयावर व्याख्यान, आयएमए सभागृह, अलंकार चौक, रामदासपेठ, सायंकाळी ६ वाजता.

प्रयास फाउंडेशन व समस्त मित्र परिवार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर अभीष्टचिंतन सोहळा, जैन कलार समाज भवन, उमरेड मार्ग, रेशीमबाग, सायंकाळी ६ वाजता.

हेमेंदू रंगभूमी : ‘लाल विधानाला उत्तर! संविधान’ नाटकाचा विशेष प्रयोग, रंगमंडप, कस्तुरबा भवन, बजाजनगर, सायंकाळी ७ वाजता.