Attack In Baramati Rana Surwanshi Attacked With Scythe
राणा सूर्यवंशी यांच्यावर सत्तूरने वार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बारामती : बारामतीतील राणा शीपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामती विमानतळ परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात सूर्यवंशी यांच्या हातावर सत्तूरने एक वार करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सूर्यवंशी विमानतळ परिसरात आपल्या कार्यालयाकडे जात होते. या वेळी पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ येऊन आरोपीने अचानक हल्ला केला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘सूर्यवंशी यांच्यावर सत्तूरने वार झाला असून, हल्ल्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही,’ अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली.