गेले अनेक दिवस विरोधक म्हणून आम्ही या शहरातील नियोजनशून्य कारभारावर बोलत आहोत. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासन या दोघांकडूनही शहरातील प्रश्नांवर आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ टक्केवारीत गुंतलेल्या काही लोकांना ठाणेकरांच्या सुरक्षेचे काहीही देणेघेणे नाही. ठाणेकर मरो अगर जगो, याचे प्रशासनाला काहीही सोयरसुतक नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केले.