Police Action On Protesters At Iit Tension Amidst Background Of Sahil Wakodes Suicide
‘आयआयटी’तील आंदोलकांवर कारवाई
Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
साहिल वाकोडेच्या कथित आत्महत्येला एक महिना पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे पालक ‘आयआयटी’त श्रद्धांजली सभा घेणार असल्याने रविवारी संस्थेच्या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते.
पोलिसांनी प्रवेशद्वारावरीलच नाही, तर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांचीही धरपकड केली. साहिलच्या पालकांचीही उचलबांगडीची तत्परता दाखवून पोलिसांनी हे आंदोलन चिरडले.याच सुमारास काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार अस्लम शेखही कॅम्पस परिसरात आले. साहिलच्या पालकांच्या वकिलाने आयआयटी प्रशासनाला पत्र पाठवून श्रद्धांजलीसाठी परवानगी घेतली होती. त्यानुसार तेही याच सुमारास ‘आयआयटी’त गेले. धरपकड केलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने सोडून परत आणावे, ही पालकांची मागणी मान्य करून पोलिसांनी विद्यार्थ्यांना परत आणले.
एखाद्या संस्थेत १३ महिन्यांत ४ विद्यार्थी आत्महत्या करत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करावी. यासाठी ‘आयआयटी’च्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षांना भेटायचे होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आम्हाला भेट दिली नाही,’ असे पालकांचे वकील ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. पालकांनी संस्थेच्या कुलसचिवांकडे मागण्यांचे पत्रक दिले.