विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
students present thrilling demonstrations
कार्यक्रमात संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांतील छात्रसैनिकांनी विविध पद्धतींनी कृत्रिम भिंतीवर चढाई करून प्रात्यक्षिके सादर केली. सनया मिस्त्री, अंश कोळी, वरदा पाटील, शुभम भोसले, अलोक भोर आणि समीक्षा कुंभार यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला ठाणे परिसरातील गिर्यारोहक, क्रीडाप्रेमी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सोनाली कोर्डे यांनी केले.