Chhatrapati Sambhajinagar University Hosts Chhau Dance Workshop And Elocution Competition
विद्यापीठात कार्यशाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कला सादरीकरण विभागात छऊ नृत्य कार्यशाळा उत्साहात पार पडली. भारतीय पारंपरिक रंगकला व छऊ नृत्याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने दहा दिवसीय कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. कार्यशाळेसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक भूमिकेश्वर सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभागासह इतर अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. या वेळी विभागप्रमुख डॉ. वैशाली बोदेले, डॉ. स्मिता साबळे, डॉ. गजानन दांडगे, डॉ. गणेश शिंदे, डॉ. प्रेषित रुद्रवार आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धा छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २२ ऑक्टोबर रोजी माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. कैलास अंभुरे, संचालक यांनी दिली. महात्मा फुले सभागृहात दुपारी दोन वाजता स्पर्धेस सुरुवात होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठीचा विषय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सांगण्यात येईल. तरी कृपया विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत नावे पाठवावीत, असे आवाहन डॉ. अंभुरे यांनी केले आहे.
आज कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण सोसायटी यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६ उपक्रमांतर्गत बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील इन्क्युबेशन सेंटर्ससाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ ते अकरा यावेळेत सीएसएमएसएस कॉलेज येथे ही कार्यशाळा होईल.