Ravan Dahan Ceremony In Cidco Area Attendance By Governor Haribhau Bagde And Minister Atul Save
श्रीरामचंद्रांच्या जयघोषात रावणदहन
Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म.टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सिडको भागातील रामलिला मैदानावर उत्तर भारत संघातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राजस्थान येथील राज्यपाल हरिभाऊ बागडे व राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. या वेळी ‘प्रभू श्रीराम चंद्र की जय, सियांवर रामचंद्र की जय‘ अशी नारेबाजी करून दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
सिडको भागातील रामलिला मैदानावर उत्तर भारतीय संघाच्या वतीने १९८२ पासून रावणदहन करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ही परंपरा आजतागायत कायम आहे. रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारत संघाचे लक्ष्मीनारायण शर्मा, ओमीराम पटेल, सुरजन सिंह, विनोद दीक्षित,मुरलीधर शर्मा, बच्चू सिंग राजपूत, सुशील कुमार सिंह, अरविंदर बिर्दी, जगदीश प्रसाद लोधी, मुकेश लोधी, मुकेश शर्मा, गणेश जोशी यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. यावेळी उद्योगपती शेखर देसरडा, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. रामलिला मैदानावर गुरुवारी (२० ऑक्टोबर) रोजी आयोजित रावण दहन कार्यक्रमात मंत्री अतुल सावे यांच्यासह राजस्थानाचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती. रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी सिडको, हडको आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रावण दहन कार्यक्रमांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.आतषबाजीने नागरिक मंत्रमुग्ध
यंदाच्या वर्षीही रामलिला मैदानावर रावण दहन कार्यक्रमापूर्वी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. ही आतिषबाजी एक तासापेक्षा अधिक वेळेपर्यंत चालली. रावण दहन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या आतषबाजीचा आनंद लुटला.
सिडको भागातील मयूरनगर येथे मयूरनगर मित्र मंडळातर्फे स्वामी समर्थ मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. या वेळी मंडळाच्या मनोज मेटे, विशाल अहेर, अनिल आहेर, राहुल तायडे, अनिल पवार, सौरभ तळेकर आणि गोकुळ कोर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या रावण दहन कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.