बीड जिल्ह्यातील नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. ‘मला देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये आणल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू असून, एकनाथ शिंदे, खरे सांगा, मला एवढी मोठी रक्कम दिली आहे का?’ असा प्रश्न त्यांनी शिंदे यांना केला.
मेळाव्यात बोलताना जरांगे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना ‘जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत,’ असे सांगितले आणि भाजपकडून ते पैसे घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ते माझ्यापर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. ‘आपल्याला खरेच ५०० कोटी मिळाले असते, तर दुष्काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला ते वाटले असते,’ असे ते म्हणाले.